

राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करून वैचारिक अभिवादन प्रश्रोत्तरी स्पर्धा परीक्षा संपन्न.. धुळे-- राजीव गांधी माध्यमिक विद्यालय अनमोल नगर देवपूर धुळे येथे आज दिनांक 6डिसेंबर 22 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस .कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक बापूसाहेब संजय एल.पवार सर .. प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री कल्याणभाऊ गरूड , सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.चंद्रकलाताई मोरे ,यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास सेवा फाऊंडेशनच्या सपनाताई शिरसाठ, श्रीमती शोभाताई आखाडे , मंजुळाताई पाटील उपस्थित होत्या.. अनेक विद्यार्थ्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला ..श्री जे .बी.सोनवणे सरांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य याविषयी माहिती दिली. तसेच कार्यक्रम प्रसंगी कल्याणभाऊ गरूड यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत वह्या पेन वाटप करण्यात आल्या.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स जळगाव व सेवा फाऊंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित्त वैचारिक अभिवादन प्रश्रोत्तरी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली..सेवा फाऊंडेशनच्या माया पानपाटील यांनी परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेतले ..कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. एस.एल.ठाकरे सरांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील श्रीमती एस.के.मोरे मॅडम यांनी केले..स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी श्री के .पी.पाटील, शालिक बोरसे सर , श्री जे बी सोनवणे सर श्री एम.एस.सूळ सर यांनी परिश्रम घेतले ..परीक्षेस 80 विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.